Video : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या ‘ओ साकी साकी’ गाण्याने लावली सोशलवर ‘आग’ !

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमचा आगामी सिनेमा ‘बाटला हाऊस’मधील एक रिक्रिएट केलेले ‘ओ साकी साकी’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात नोरा फतेहीने आपल्या डान्सचा तडका लावला आहे. हे गाणं २००४ साली आलेल्या मुसाफिर या सिनेमातील आहे. या सिनेमात संजय दत्त म्हणजे बॉलिवूडचा बाबा लिड रोलमध्ये होता. त्यावेळी हे गाणं सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांनी गायलं होतं. या गाण्यात कोयना मित्राने डान्स केला होता.

यावेळी हे गाणं रिक्रिएट करून बाटला हाऊस सिनेमात वापरण्यात आलं आहे. तनिष्क बाग्चीने हे गाणं रिक्रिएट केलं आहे. या नवीन गाण्याला नेहा कक्कर, तुलसी कुमार आणि बी प्राक यांनी मिळून गायलं आहे. नोराबद्दल सांगायचे झालं तर, जॉन अब्राहमसोबत हे तिचं दुसरं गाणं आहे. याआधीही तिने ‘सत्यमेव जयते’ सिनेमात जॉन अब्राहम सोबत ‘दिलबर दिलबर’ हे गाणं केलं होतं. हे गाणं १९९९ साली आलेल्या ‘सिर्फ तुम’ सिनेमातील होतं. या ओरिजिनल गाण्यात सुष्मिता सेनने शानदार परफॉर्मंस दिला होता.

ADV

https://twitter.com/itsBhushanKumar/status/1150657819701600256

जॉनचा बाटला हाऊस हा सिनेमा २००८ मधील एका विवादित एनकाऊंटरवर आधारीत आहे. जॉन या सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार जॉनच्या या भूमिकेचे नाव संजीव कुमार यादव असणार आहे.

एअरलिफ्ट सिनेमाचे दिग्दर्शन करणारे निखिल आडवाणी या सिनेमाची धुरा सांभाळत आहेत. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय याच दिवशी साऊथचा सुपरस्टार प्रभासचा साहो, तर खिलाडी अक्षय कुमारचा मिशन मंगल हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या