Bollywood Celebs Became Parents In 2020 : शिल्पा शेट्टीसह ‘या’ 5 अ‍ॅक्ट्रेस यावर्षी झाल्या माता, पहा मुलांचे गोंडस फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   यावर्षी अनेक अभिनेत्रींनी आपण आई होणार असल्याची घोषणा केली आहे, तर काही अभिनेत्रींनी आई झाल्याची खुशखबर लोकांसोबत शेयर केली. बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीपासून अमृता रावपर्यंत आई होण्याच्या बातम्यांनी यावर्षी सर्वांना आश्चर्यचकित केले. ही यादी थोडी मोठी आहे, यासाठी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगणार आहोत, की यावर्षी कुणा-कुणाच्या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आहे.

शिल्पा शेट्टी :

शिल्पा शेट्टीच्या घरी 15 फेब्रुवारी 2020 ला मुलीचा जन्म झाला. शिल्पाने आपल्या मुलीचे नाव समीषा ठेवले आहे. समीषाचा जन्म सेरोगसीद्वारे झाला होता. शिल्पा नेहमीच आपल्या मुलीचे फोटोज इंस्टाग्रामवर शेयर करत असते.
https://www.instagram.com/theshilpashetty/?utm_source=ig_embed

अमृता राव :

अमृता रावने 1 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला. ती लग्नानंतर 4 वर्षानंतर आई झाली. अमृता आणि आर जे अनमोलने इंस्टाग्रामवर मुलाचे फोटो शेयर केले होते.

https://www.instagram.com/amrita_rao_insta/?utm_source=ig_embed

कल्की केंकला :

बॉलीवुड अभिनेत्री कल्की केंकलाने 7 फेब्रुवारी 2020 ला मुलीला जन्म दिली. कल्की आपला बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गच्या मुलीची आई झाली आहे. मुलीचे नाव तिने सफ्फो ठेवले आहे. तिने लिहिले होते, ’प्लीज वेलकम सेफो…मागील 9 महिने माझ्या पोटात एका मोमोप्रमाणे राहात होती, आता तिला सुद्धा जागा द्या.

https://www.instagram.com/kalkikanmani/?utm_source=ig_embed

लीजा हेडन :

बॉलीवुड अभिनेत्री लीजा हेडन दुसर्‍यांदा आई झाली आहे. लीजाला अगोदर एक मुलगा आहे. तिला दुसर्‍यांचा सुद्धा मुलगा झाला आहे. लीजाने 13 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिली होता.

https://www.instagram.com/lisahaydon/?utm_source=ig_embed

नताशा स्टेन्कोविक :

बॉलीवुड अभिनेत्री नताशा स्टेन्कोविकने 31 जुलैला मुलाला जन्म दिला. नताशा आणि भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा यावर्षी 1 जानेवारीला साखरपुडा झाला होता आणि यानंतर याच वर्षी दोघांनी विवाह केला होता.

https://www.instagram.com/natasastankovic__/?utm_source=ig_embed