home page top 1

दीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली ? कार्यक्रमादरम्यान घडली ‘ही’ चूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोण आपले लग्न आणि तिचा नवरा विसरताना दिसत आहे. एका कार्यक्रमादरम्यान दीपिका म्हणाली, ‘मी एक मुलगी, एक बहीण, अभिनेत्री आहे.’ हे बोलल्यानंतर दीपिका यावर अडकून पडली, शोची होस्ट तिला ‘एक पत्नी है’ असे बोलून आठवते. तर दीपिका म्हणते, ‘अरे हो मी विसरले होते’ आणि इतकं बोलून हसण्यास सुरवात होते.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही लोकांना हा व्हिडिओ मजेशीर वाटत आहे तर काहीजण असे सांगत आहेत की लग्न ही महत्वाची गोष्ट दीपिका कशी विसरणार ? एका दिवसात हा व्हिडिओ लोकांनी हजार वेळा पाहिला आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या कार्यक्रमादरम्यान दीपिका लग्नाची बाब विसरली असेल. पण या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याची संधी कधीच सोडली नाही. दीपिका आणि रणवीर दोघेही बर्‍याचदा एकमेकांच्या फोटोंवर रोमँटिक कमेंट करताना दिसतात. आता लवकरच हे दोघेही चित्रपटाच्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ’83’ हा चित्रपट या दोघांचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट असेल. या चित्रपटात रणवीर सिंग दिग्गज क्रिकेटपटू कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी दीपिका पादुकोण आपल्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरसोबत ’83’ शिवाय दीपिकाकडे ‘छपाक’ देखील आहे. हे दोन्ही चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

 

Loading...
You might also like