‘देसी गर्ल’ प्रियंकाच्या ‘द व्हाईट टायगर’ सिनेमावर बंदी घालण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार ! जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी हॉलिवूड प्रोड्युसर जॉन हार्ट जुनियर यांच्या त्या याचिकेचं खंडन केलं ज्यात त्यांनी द व्हाईट टायगर सिनेमावर बंदी घालण्याची मागण्याची केली होती. प्रोड्युसरनं या सिनेमावर कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचा आरोपा केला होता.

न्यायमुर्ती सी हरी शंकर यांनी निर्मात्यांनी दिलेला स्टे अर्ज हे सांगत फेटाळला की, सिनेमा रिलीज होण्याच्या 24 तास आधी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचं देखील एका कारण समजलं नाही. जस्टीस सी हरी शंकरच्या खंडपीठानं सिनेमाचे प्रोड्युसर मुकुल डेओरा आणि नेटफ्लिक्स यांना समन्स पाठवलं आहे.

या प्रकरणी अमेरिकन प्रोड्युसर जॉन हार्ट युनियर कॉपीराईटचा आरोप करत नेटफ्लिक्सवर याच्या स्ट्रीमिंगवर स्थगिती देण्याचं आवाहन केलं होतं. हा सिनेमा 22 जानेवारी 2021 म्हणजे आजच रिलीज होत आहे.

द व्हाईट टायगर या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. पुस्तकाचं नाव देखील द व्हाईट टायगर हेच आहे जो 2008 सालीच रिलीज झाला होता. अरविंद अडिग यांना यासाठी पुरस्कार देखील मिळाला होता.

याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं की, त्यांच्यात आणि अडिग यांच्यात 2009 साली एक अॅग्रीमेंट झालं होतं. यानुसार जॉन हार्ट ऑस्करसाठी जान्यायोग्य एक सिनेमा बनवणार होते. हा सिनेमा हॉलिवूडमध्ये रिलीज केला जाणार होता. यानंतर त्यांना 2019 साली ऑक्टोबर मध्ये कळालं की, नेटफ्लिक्स हा सिनेमा बनवत आहे आणि हा सिनेमा रिलीजही करणार आहे यानंतर त्यांनी नेटफ्लिक्स आणि डेओरा यांना नोटीसही पाठवली होती.