Farmers Protest : ‘…म्हणून डिलीट केलं होतं आधीचं Tweet !’, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं कारण

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   केंद्र सरकारच्या कृषी कायद्यां विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. याला अनेक सेलेब्सनं आजवर पाठींबा दिला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनीही ट्विट करत पुन्हा एकदा यावर भाष्य करत शेतकऱ्यांचं समर्थन केलं आहे. सरकरानं यावर लवकर मार्ग काढावा असंते म्हणाले आहेत. याआधीही त्यांनी यावर भाष्य करत ट्विट केलं होतं. परंतु अचानक त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं होतं. त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत काहींना त्यांना ट्विट डिलीट करण्यासाठी ट्रोलही केलं होतं. एका ट्विटला रिप्लाय देताना आता त्यांनी ट्विट डिलीट करण्यामागील कारण सांगितलं आहे.

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले धर्मेंद्र ?

ADV

धर्मेंद्र यांनी ट्विटरवरून त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात ते दु:खी दिसत आहेत. ट्विटमध्ये ते लिहितात, शेतकरी बांधवाचा त्रास पाहून दु:ख होत आहे. सरकरानं यावर लवकर मार्ग काढायला हवा असंही ते म्हणाले आहेत.

पूर्वीच्या डिलीट केलेल्या ट्विटमध्ये काय म्हणाले होते धर्मेंद्र ?

पूर्वीच्या डिलीट केलेल्या ट्विटमध्ये धर्मेंद्र म्हणाले होते की, सरकारला विनंती आहे की, शेतकरी बांधवांच्या अडचणींवर काही मार्ग काढावा. कोरोनाच्या केसेस दिल्लीत वाढत आहेत. हे खूप दु:खद आहे.

ट्विट डिलीट करण्याचं सांगितलं कारण

एका ट्विटला रिप्लाय देताना आपल्या ट्विटमध्ये धर्मेंद्र यांनी लिहिलं की, तुमच्या याच कमेंट्सनी (ट्रोलिंगवाल्या कमेंट्स) दु:खी होऊन मी माझं ट्विट डिलीट केलं होतं. हव्या तेवढ्या शिव्या द्या. तुमच्या आनंदात माझाही आनंद आहे. हा मी माझ्या शेतकरी बांधवासाठी खूप दुखी आहे. सरकारनं लवकरच मार्ग काढायला हवा. आमची कोणतीही सुनावणी नाही असंही ते म्हणाले आहेत.