Drugs Case : ‘या’ कारणामुळं अर्जुन रामपालची आज NCB कडून चौकशी झाली नाही !

पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) पुन्हा एकदा बॉलिवूड अ‍ॅक्टर अर्जुन रामपाल ( (Arjun Rampal) ला समन्स पाठवलं होतं. आता सुशांत केसमधील ड्रग्ज अँगल प्रकरणी त्याची चौकशी केली जाणार आहे. 16 डिसेंबर रोजी म्हणजेच आजच अर्जुन चौकशीसाठी एनसीबी समोर हजर राहण्याची शक्यता होती. परंतु आज त्याला चौकशीचा सामना करावा लागलेला नाही.

अभिनेत्याच्या अधिकृत टीमनुसार, अर्जुन सध्या मुंबईच्या बाहेर आहे. त्यामुळं आज तो चौकशीसाठी हजर राहू शकला नाही. अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिची एनसीबीनं 6 तास चौकशी केली होती.

एनसीबीच्या सूत्रांच्या मते, अर्जुन रामपालची एनसीबीनं जेव्हा पहिल्यांदा चौकशी केली तेव्हा त्याच्या विधानांमध्ये विरोधाभास होता. एनसीबीला अर्जुन रामपाल विरोधात काही नवीन पुरावे मिळाले आहेत. यामुळं आता अर्जुन आणि त्याच्या जवळच्यांची अडचण वाढू शकते.

यापूर्वी ड्रग्ज बाळगणं आणि त्याची खरेदी विक्री करणं या गुन्ह्यात अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) चा भाऊ अगिसियालोस डेमेट्रिएड्स (Agisilaos Demetriades) याला एनसीबीनं पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आलं होतं. अशी माहिती आहे की, त्याला या केसमध्ये ताब्यात घेतल्यानंतर जामीन मिळाला होता. परंतु त्याला एनसीबीनं पुन्हा एकदा ताब्यात घेतलं होतं. धर्मा प्रॉडक्शनचा माजी एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर क्षितिज प्रसाद यालाही एनसीबीनं या प्रकरणी अटक केली होती.