Bollywood Drugs Case : अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी NCB चा छापा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये ड्रग्ज (Drugs) कनेक्शन केसचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) आज अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्या मुंबईतील घरी छापा मारला. एनसीबीची एक टीम अर्जुन रामपाल याच्या घरी आणि ऑफिसात सर्च ऑपरेशन करत आहे.

एनसीबीनं छापा टाकल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. ड्रग्स केसचं प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे.