‘या’ कारणामुळं ‘इश्क’ सिनेमानंतर एकत्र काम करताना नाही दिसले ‘आमिर-जुही’ अनेक वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांनी सोबतच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 1988 साली आलेल्या कयामत से कयामत तक (Qayamat Se Qayamat Tak)या पहिल्या सिनेमातून त्यांनी धमाल केली. यानंतर ही जोडी अनेक सिनेमात काम करताना दिसली. परंतु असं काय झालं की, इश्क (Ishq) सिनेमानंतर मोठ्या पडद्यावर दोघं कधीच एकत्र दिसले नाही.

अलीकडेच इश्क सिनेमाच्या रिलीजला 23 वर्षे पूर्ण झाली. हा सिनेमा 28 नोव्हेंबर 1997 साली रिलीज झाला होता. हिट झालेल्या या सिनेमात अजय देवगण आणि काजोल यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

जेव्हा इश्क सिनेमाची शुटींग सुरू होती तेव्हा सेटवर आमिरनं जुहीची चेष्टा केली जी त्यांच्या नात्यावर भारी पडली. मीडिया रिपोर्टनुसार, सेटवर असताना आमिरनं जुहीचा हात मागितला आणि म्हणाला, त्याला ज्योतिष माहितीये. जुहीनं हात देताच आमिर थुंकला. यामुळं जुही खूप नाराज झाली होती. तिला आमिरची अशी चेष्टा अजिबात आवडली नव्हती.

जुहीला याचा एवढा राग आला होता की, ती सिनेमा सोडायलाही तयार होती. पंरतु नंतर कसंतरी करून सिनेमाची शुटींग पूर्ण करण्यात आली. शुटींग दरम्यान दोघं एकमेकांपासून दूर रहात होते. 5 वर्षे असं चालू राहिलं. ते एकमेकांशी बोलले देखील नाही. नंतर गोष्टी बदलल्या आणि दोघांमध्ये बातचित सुरू झाली. परंतु या घटनेनंतर दोघांनी कधीच एकमेकांसोबत सिनेमात काम केलं नाही.

You might also like