मेहंदी सिनेमातील अभिनेता फराज खान यांचं निधन, पूजा भट्टनं दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेता फराज खान (Faraaz Khan Death) चे निधन झाले आहे. तो 46 वर्षांचा होता आणि बंगळुरूच्या एका हॉस्पिटल दीर्घ कालावधीपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. अभिनेत्री पूजा भट्टने ’मेहंदी’ चित्रपटातील अभिनेता फराज खानच्या निधनाची माहिती दिली आहे.

पूजा भट्टने ट्विट करत म्हटले, की जड अंत:करणाने ही बातमी सांगावी लागत आहे की, #FaraazKhan आपल्याला सर्वांना सोडून गेले आहेत. मला आशा आहे, की ते एका चांगल्या जगात असतील. तुमची मदत आणि शुभेच्छांसाठी आभार. कृपया त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करा. ते एक असा शून्य सोडून गेले आहेत तो भरून काढणे अवघड होईल.

पूजाने फराजसाठी आर्थिक सहायतेची सुद्धा मागणी केली आहे. ज्यानंतर सलमान खानने त्याची सर्व बिले भरली आहेत. या बाबतची माहिती अभिनेत्री कश्मीरा शाहने दिली होती. फराज खानची आर्थिक स्थिती ठीक नव्हती. मागील काही दिवसांत त्याच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी एका फंड- रेजर वेबसाइटद्वारे लोकांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

फराज खानचे वडील यूसुफ खान सुद्धा एक अ‍ॅक्टर होते. वडिलांप्रमाणेच फराज खानने सुधा अ‍ॅक्टिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. फराज खान, राणी मुखर्जीसोबत मेहंदी, दुल्हन बनूं मैं तेरी आणि फरेबसह बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांतून दिसला होता.

फराजचा चित्रपट ’फरेब’चे गाणे ’तेरी आंखें झुकी झुकी’ खूप हिट झाले होते. राणी मुखर्जी स्टारर चित्रपट ’मेहंदी’ फराज खानचा शेवटचा चित्रपट होता. फराज सुमारे एक वर्षापासून छातीतील कफ आणि संसर्गाशी लढत होता.