शुक्रवारीच का रिलीज होतात सिनेमे ? जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मुगल-ए-आजम या सिनेमानं सिनेजगतात एक नवीन अध्याय लिहिला. ताबडतोब कमाईसोबतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर मध्ये धुमाकूळ घालणारा होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि सुपरडुपर हिट झाला. शुक्रवार लक्ष्मी मातेचा वार आहे. या दिवशी केलेल्या सुरुवातीला कायमच यश मिळतं.

3 मे 1913 रोजी रिलीज झालेला पहिला हिंदी सिनेमा राजा हरिश्चंद्राच्या निर्मितीपासून तर मुगल-ए-आजम (1960) पर्यंत सिनेमा रिलीज होण्याचा एक खास मुहूर्त ठरलेला नव्हता. जास्त करून सिनेमे हे सोमवारीच रिलीज केले जात होते. 1913 ते 1960 च्या दरम्यान बॉलिवूडनं अनेक उत्तम आणि सुपरहिट सिनेमे दिले. ज्यांची मिसाल आजही दिली जाते. तो जमाना ब्लॅक अँड व्हाईटचा होता.

काही लोकांचं म्हणणं आहे की, हिंदी सिनेजगतात ही प्रथा हॉलिवूडमधून आली आहे. हॉलिवूडमधील पॉप्युलर सिनेमा गॉन विथ द विंड 15 डिसेंबर 1939 रोजी रिलीज करण्यात आला होता. या दिवशी शुक्रवार होता. तसं तर प्रत्येकाचा आपला आपला दृष्टीकोन असतो. काहीही असलं तरी मुगल-ए-आजम नंतर बॉलिवूडमध्ये अशी प्रथा पडली ज्यानंतर आता सिनेमे हे शुक्रवारीच रिलीज केले जातात. 1960 नंतर बॉलिवूडनं अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

भारतातील सर्वता मोठा आणि क्लासिक सिनेमा मुगल-ए-आजम 5 ऑगस्ट 1960 रोजी म्हणजेच शुक्रवारी रिलीज करण्यात आला होता. या सिनेमानं जबरदस्त कमाई केली. शुक्रवारी रिलीज होणारा हा पहिला सिनेमा होता. या सिनेमाचं यश पाहून बॉलिवूड थक्क झालं होतं. यानंतर बॉलिवूडमध्ये शुक्रवारी सिनेमे रिलीज करण्याची प्रथा सुरू झाली.

शुक्रवारनंतर दोन दिसवांची सु्ट्टी असते या हिशोबानं जास्त जास्त प्रेक्षक सिनेमा पाहतात. हेच जर सिनेमा सोमवारी रिलीज झालातर हे शक्य होत नाही. हेच कारण आहे की, इतर निर्माता आणि दिग्दर्शकांचं लक्षही शुक्रवारकडे वेधलं गेलं.