माधुरी दीक्षितची ‘ती’ सुपरहिट गाणी ज्यासाठी कायम लक्षात राहतील सरोज खान ! (व्हिडीओ)

रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खाननं जगाचा निरोप घेतला आहे. कार्डियक अरेस्टमुळं मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं त्यांना बांद्र्यातील गुरू नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (शुक्रवार दि 3 जुलै 2020) त्यांना मालाड येथील कब्रिस्तानात सुपुर्द-ए-खाक करण्यात आलं. त्यांना अखेरचा निरोप देण्याासाठी त्यांचे काही कुटुंबीय आणि जवळचे नतेवाईक उपस्थित होते. त्या 71 वर्षांच्या होत्या.

https://youtu.be/PriYgiqUOlE

सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, आलिया भटसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसाठी कोरियोग्राफी केली आहे. आपल्या डान्स आणि एक्सप्रेशननं माधुरी दीक्षितनं इंडस्ट्रीत तिचं जे काही स्थान तयार केलं आहे यामागे सरोज खानचा खूप मोठा रोल आहे.

https://youtu.be/DqxIFvsLcRQ

माधुरी दीक्षितची अनेक हिट गाणी सरोज खाननं कोरियोग्राफ केली आहेत. धक धक करेन लगा पासून तर तबाह हो गए पर्यंत माधुरीची अनेक हिट गाणी आहेत ज्यासाठी सरोज खानला लक्षात ठेवलं जाईल.

https://youtu.be/MS5BLS2sIDM

सरोज यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक सुपरडुपरहिट सिनेमांसाठी कोरियोग्राफी केली आहे. यात मिस्टर इंडिया, चांदनी, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेस, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी वेट, एजेंट विनोद, राऊडी राठोड, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका असे अनेक सिनेमे सांगता येतील.

https://youtu.be/8nd5NLbUu44

71 वर्षीय सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. 50च्या दशकात त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. आपल्या 4 दशकाच्या करिअरमध्ये त्यांनी 2000 हून अधिक गाणी कोरियोग्राफ केली आहेत. 1974 साली आलेल्या गीता मेरा नाम या गाण्यानं त्यांना कोरियोग्राफर म्हणून फिल्म इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला होता. 2019 साली आलेल्या कलंक या सिनेमासाठी त्यांनी अखेरची कोरियोग्राफी केली आहे.

https://youtu.be/Jbn39j-xa-k

https://youtu.be/AX1ro0AJk_I