अलाया फर्निचरवाला पुन्हा दिसली रुमर्ड बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरेसोबत, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री अलाया फर्निचरवाला ही मुंबईत पुन्हा एकदा दिसली. पण ती यावेळी तिच्या रुमर्ड (अफवा असलेल्या) बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरे आणि त्यांची आई स्मिता ठाकरे यांच्यासोबत हँगआऊट करताना. अलाया फर्निचरवाला हिने त्यादरम्यान काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. त्याचसोबत तिने पांढऱ्या रंगाचे बूटही घातले होते.

ऐश्वर्य ठाकरेने काळा रंगाचा टी-शर्ट आणि लाल रंगाचा रुमाल बांधला होता. तर स्मिता ठाकरे यांनी ग्रे कलरचा ड्रेस घालला होता. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्य आणि अलाया या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या सुरु आहेत. तसेच ऐश्वर्य अलायाच्या बर्थडे पार्टीमध्येही दिसला होता. तेव्हापासून दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नुकतेच अलायाने दुबईत मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला होता.

ऐश्वर्यसोबत असणाऱ्या नात्याबाबत अलाया हिने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, की ‘ऐश्वर्य माझा चांगला मित्र आहे. आमच्या कुटुंबामध्येही चांगली मैत्री आहे. माझी आई आणि आजोबाही ऐश्वर्यच्या आईला ओळखतात. आमच्या दोघांचे कुटुंबीय एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. फक्त मीडियाची नजर आमच्यावर आता आली आहे. त्यामुळेच त्यांना वाटते की आमच्या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे. जर त्यांनी पहिल्यापासूनच आम्हाला फॉलो केले असते तर त्यांना अनेक फोटो मिळाले असते’.

पूजा बेदीची मुलगी आहे अलाया
अलाया ही लवकरच फिल्ममध्ये दिसणार आहे. अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे. अलायाने अभिनेता सैफ अली खानसोबत चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय ती सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ती फोटो अन् व्हिडिओही ती शेअर करत असते.