Disha Patani नं महागडी गाडी सोडून केला रिक्षात प्रवास, पहा ‘व्हायरल’ फोटो

पोलीसनामा ऑनलाईन : अलीकडेच चित्रपट अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani) वर्सोवामध्ये एका जाहिरातीचे शूटिंग करत होती. शूटिंग संपल्यानंतर तिने आपल्या महागड्या कारऐवजी रिक्षाने प्रवास केला. बॉलिवूडमधील अनेक कलाकार रिक्षात बसताना दिसले आहेत. ते आपली महागडी कार सोडून रिक्षात प्रवास करणे पसंत करतात. फिल्म अभिनेत्री दिशा पटानीला (Disha Patani ) देखील नुकतेच आपली महागडी कार सोडून रिक्षात प्रवास करताना पाहण्यात आले. दिशा पटानी (Disha Patani ) अ‍ॅड शूट करण्यासाठी बाहेर पडली होती. शूटिंग पूर्ण झाल्यावर तिने एका ऑटो रिक्षाने प्रवास केला.

तिला एका ऑटो रिक्षात बसल्याचे पाहून फोटोग्राफर्सनी जोरदार फोटोबाजी केली. फोटोमध्ये दिशा पटानीला काळ्या रंगाचा टॉप आणि ट्राऊजरवर पाहिले जाऊ शकते. तिचे केस मोकळे असून तिने फेस मास्क परिधान केलेला आहे.

काही काळापूर्वी सनी लिओनीने देखील रिक्षात बसून प्रवास केला होता. सनी लिओनीच्या म्हणण्यानुसार, रिक्षा हे सर्वात चांगले परिवहन माध्यम आहे. दिशा नुकतीच मालदीवमध्ये 2021 वर्षाच्या स्वागतासाठी पोहोचली होती. ती आपल्या रूमर्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये दिसली होती. तिने इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले होते, जे व्हायरलही झाले होते. दिशा पटानी लवकरच राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत.

दिशा पटानी ही एक फिल्म अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. दिशा पटानीचे फोटो खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस असतात. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्यातील अफेअरच्या बातम्या बऱ्याच काळापासून बॉलिवूड सर्कलमध्ये आहेत. तथापि, दोघांनी अद्याप आपलं नातं सार्वजनिक केलेले नाही. त्यांच्या दोघांच्या चित्रपटांनाही खूप पसंती मिळत असते.