कियारा आडवाणीच्या ‘या’ फोटोला 3 तासांत 15 लाखांहून अधिक Likes ! प्रचंड व्हायरल झालेल्या ‘या’ फोटोत नेमकं आहे तरी काय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) आपल्या अ‍ॅक्टिंग सोबतच फॅशन आणि स्टाइलसाठीही फेमस आहे. 2014 साली कियारानं बॉलिवूड डेब्यू केला होता. आता ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअरच्या काही काळातच तिनं खूप पॉप्युलॅरिटी मिळवली आहे. सध्या कियारा तिच्या एका फोटोमुळं चर्चेत आली आहे.

कियारानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती गोल्डन कलरच्या चमकत्या साडीत दिसत आहे. स्लीव्हलेस ऑफ शोल्डर ब्लाऊज घालत तिनं याला बोल्डनेसचा तडकाही दिला आहे. तिचं हॉट स्लीव्हलेसही स्पष्ट दिसत आहे. कियारा खूपच आकर्षक दिसत आहे, कारण या साडीत तिची फिगर आणखीच मादक वाटत आहे.

कियाराचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या फिगर आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अवघ्या 3 तासांत या फोटोला 15 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अजूनही याचे लाईक्स वाढत चालले आहेत.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुड न्यूजनंतर आता तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. कियारा इंदू की जवानी, भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जियाे हा सनेमाही आहे. नुकताच तिचा लक्ष्मी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.

You might also like