श्रद्धा कपूर रुमर्ड बॉयफ्रेंड रोहन शेष्ठसोबत मालदीवमध्ये स्पॉट, घरच्यांनी म्हटले – ‘फॅमिली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फिल्म अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच शेअर करत असते. श्रद्धा कपूर सध्या मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. वास्तविक प्रियंक शर्मा आणि शाजा मोरानी लग्नानंतर मालदीवमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहेत. यापूर्वी लग्नाचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. आता तेजस्विनी कोल्हापुरेने इन्स्टाग्रामवर ‘फॅमिली’ चा एक फोटो शेअर केला आहे. तेजस्विनी कोल्हापुरेने फोटो शेअर करत लिहिले कि, ‘फॅमिली’. श्रद्धा कपूर या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मात्र श्रद्धासोबत तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड रोहन शेष्ठ देखील पाहायला मिळत आहे.

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्यातील संबंध बर्‍याच दिवसांपासून माध्यमांत चर्चेचा विषय बनले आहेत. यापूर्वी जेव्हा रोहनने वरुण धवन आणि नताशा दलालला सोशल मीडियावर लग्नासाठी अभिनंदन केले होते, त्यानंतर वरुण धवनने लिहिले की, ‘मला खूप आनंद झाला आहे आणि मला वाटते की तू तयार असशील’. यानंतर सोशल मीडियावर रोहन श्रेष्ठ आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाविषयी चर्चा होऊ लागली.

श्रद्धा कपूरचे वडील आणि अभिनेता शक्ती कपूर यांना तिच्या लग्नाबद्दल विचारले असता ते म्हणाले कि, “बातम्यांमध्ये काय चालले आहे याची मला कल्पना नाही परंतु मी माझ्या मुलीच्या बाजूने उभा राहीन आणि मला वाटते की ती जे काही करेल ते योग्य असेल. ती रोहन श्रेष्ठ काय , ज्याच्यासोबतही लग्न करू इच्छिते मला काही हरकत नाही.