रेखाने विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडलेल्या महिलेबद्दल म्हंटले असे काही; Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध अभिनेत्री रेखा इंडियन आयडल 12 कार्यक्रमात विशेष पाहुणी म्हणून उपस्थित होणार आहे. नुकत्याच झालेल्या प्रोमोमध्ये शो होस्ट जय भानुशाली रेखाला सांगतो की, तुम्ही कधी अशी महिला पाहिली आहे, जी एका विवाहित माणसाच्या प्रेमात वेडी आहे. यावर रेखाने झटक्यात उत्तर दिले ‘मला विचारा ना’. यानंतर तिने हा मुद्दा कापला आणि म्हणाली, ‘मी काही बोललेच नाही.’

त्यानंतर सेटवर प्रत्येकजण हसू लागला आणि टाळ्या वाजवू लागतो, त्याआधी जय भानुशाली असे म्हणताना दिसला की, ‘रेखा जी, नेहू, तुम्ही कधी पाहिले आहे का? एखादी बाई जी एका पुरुषासाठी इतकी वेडी आहे, तेही तो विवाहित असताना. ‘रेखाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहा कक्कड़ आणि विशाल ददलानी यांना हसू आवरले नाही. यावर जय भानुशाली प्रतिक्रिया देताना म्हणतो, क्या बात है! यह लगा सिक्सर’. याआधी सेटवर रेखाला ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना पाहिले जाऊ शकते. हे गाणे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे प्रेम प्रकरण खूप चर्चेत असते. आजही त्याची चर्चा होत आहे. रेखाने बहुधा या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे असा प्रत्येकाचा विचार आहे. रेखा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आजही खूप प्रसिद्ध आहे. तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या चित्रपटांना खूप पसंती मिळाली होती. रेखा आणि अमिताभ यांच्या जोडीलाही खूप पसंती मिळाली होती. पण, आता या दोघांनाही क्वचितच एकत्र पाहिले जाते. पण या दोघांनीही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.