प्रभासच्या सिनेमात दिसण्यासाठी ‘बिग बी’ अमिताभ घेणार तब्बल 21 कोटी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथमधील सुपरहिट सिनेमा महानती (Mahanati) चा डायरेक्टर नाग अश्विन (Nag Ashwin) याच्या आगामी प्रोजेक्टवर जेव्हापासून चर्चा सुरू आहे तेव्हापासून तो चर्चेत आहे. या सिनेमात नाग अश्विननं पेन इंडिया स्टार बनलेल्या प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ला कास्ट केलं आहे. या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हेही असतील अशी माहिती आहे. असंही समजत आहे की, या सिनेमाचा भाग होण्यासाठी 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी 21 कोटींची रक्कम मागितली आहे.

प्रभास-दीपिका आणि अमिताभ यांचा हा मल्टी लँग्वेज सिनेमा 2022 मध्ये देशभरात रिलीज होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, या सिनेमासाठी अमिताभ यांनी 21 कोटी एवढी फी मागितली आहे. परंतु यावर मेकर्स किंवा बिग बींकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय दीपिकानं किती रक्कम मागितली होती, याचाही खुलासा झालेला नाही.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. नागपूरमध्ये सिनेमाची शूटिंग झाली आहे.

You might also like