‘या’ हॉलिवूड सिनेमात झळकणार जॅकलीन फर्नांडिस ! साकारणार अत्यंत वेगळी भूमिका, भारतात होणार शुटींग

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोण यांनी हॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. आता या यादीत आणखी एक नाव अ‍ॅड झालं आहे. बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) लवकरच हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. वुमन स्टोरीज सिनेमातून जॅकलीन ती हॉलिवूड डेब्यू करणार आहे.

वुमन स्टोरीज या सिनेमात वेवगेगळ्या जॉनरच्या 6 स्टोरीज दाखवल्या जाणार आहेत यातील एका स्टोरीत जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे. लीना यादव या सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. त्यांनी याआधी पार्च्ड, राजमा चावल आणि तीन पत्ती असे सिनेमे बनवले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार जॅकलीनच्या पार्टचं नाव, शेअरींग अ राईड आहे. यात ती ट्रान्सजेंडर मॉडेल अंजली लामाच्या भूमिकेत दिसणार आहे. वुमन स्टोरीज या सिनेमाची शुटींग इटली, भारत आणि अमेरिका अशा देशात होणार आहे.

लैंगिक समानता प्रमोट करणारी संस्था वी टू इट टूगेदर ही देखील सिनेमाला सपोर्ट करत आहे. जॅकलीन यापूर्वी 2015 साली आलेल्या डेफिनिशन ऑफ फियर या सिनेमात झळकली आहे. हा एक हॉरर थ्रिलर सिनेमा होता. 5 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला होता.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती जॉन अब्राहमच्या अटॅक या सिनेमात दिसणार आहे. सध्या तिच्याकडं भूत पोलीस, किक 2 , सर्कस आणि बच्चन पांडे हे सिनेमे देखील आहेत. लवकरच ती आता वुमन स्टोरीज सिनेमातून हॉलिवूड डेब्यू करत आहे. याआधी ती मिसेज सिलियर किलर या वेब सीरीजमध्ये दिसली आहे. 2009 साली आलेल्या अलादीन या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं.