आपल्या वाढदिवशी सुट्टी घेणार नाही जान्हवी कपूर, ‘असं’ करणार सेलिब्रेशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या वर्कआउट फोटोंमुळे किंवा जीमबाहेर स्पॉट झाल्यानं नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती आपल्या बर्थ डे मुळं चर्चेत आली आहे. उद्या(शुक्रवार दि 6 मार्च रोजी) जान्हवी कपूरचा वाढदिवस आहे. उद्या ती आपला 23 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आपल्या स्पेशल डेसाठी तिनं स्पेशल प्लॅनिंग केलं आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, “जान्हवी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आगामी सिनेमा रूफी आफ्जा या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. यानंतर रात्री तिचा आपल्या फॅमिलीसोबत डिनर प्लॅन आहे. त्यामुळं तिनं रात्री शुटींग कॅन्सल केली आहे. तिची डिनर पार्टी तिची बहिण अंशुला शुक्लाच्या घरी होणार आहे.

रूफी आफ्जा सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत असणार आहे. हार्दिक मेहता हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B88xzGcHOC1/?utm_source=ig_embed

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. रूही आफ्जाव्यतिरीक्त ती गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.

https://www.instagram.com/p/B8S3pJPAKNx/