Video : ‘बाटला हाउस एनकाऊंटर’ घटनेची आठवण करुन देणारा ‘हा’ व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘बाटला हाउस’ चित्रपटाच्या पहिल्या टीजरनंतर आता दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर २००८ ला जामिया नगरच्या बाटला हाउसमध्ये इंडियन मुजाहिदीनच्या विरोधात झालेल्या ऑपरेशनवर आधारित आहे. अभिनेता जॉनच्या या चित्रपटाचा ट्रेलर १० जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटामध्ये जॉन अब्राहमने पोलिसाची भूमिका साकारली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, जॉन संजीव कुमार यादव नावाच्या पोसिलाची भूमिका साकारत आहे.

चित्रपट ‘बाटला हाउस एनकाऊंटर’वर आधारित आहे. याला ‘ऑपरेशन बाटला हाउस’ या नावाने ओळखले जाते. या घटनेमध्ये १९ सप्टेंबर २००८ ला दिल्लीच्या जामिया नगरमध्ये स्थित बाटला हाउसमध्ये इंडियन मुजाहिदीन आतंकवादीच्या विरोधात कारवाई केली होती.

अक्षय कुमार सारखा सध्या अभिनेता जॉन पण गंभीर विषय घेऊन चित्रपट करत आहे. त्याचा ‘परमाणु’ चित्रपटही राष्ट्रीय मुद्द्यावर आधारित होता. याआधी जॉनने तो प्रधानमंत्री राजीव गांधीची हत्या या घटनेवर ‘मद्रास कॅफ़े’ चित्रपट केला आहे.

‘एयरलिफ्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले निखिल आडवाणी या चित्रपटाचे महत्वाचे काम संभाळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी फक्त जॉनचा चित्रपट नसून सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘मिशन मंगल’ प्रदर्शित होणार आहे. या दिवशी ३ चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहे. आता पहायचे हे आहे की, बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट आपली जादू करणार ?

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय