‘तांडव’वर प्रचंड संतापली कंगना राणावत, म्हणाली – ‘जाणूनबुजून ठेवले असे सीन्स, अल्लाची चेष्टा करण्याची हिंमत आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांडव (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडियावर याला विरोध होताना दिसत आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. यावरून आताा वाद सुरू झाला आहे जो काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. नेटकऱ्यांसह अनेक राजकीय नेत्यांचा सीरिजला विरोध होत असतानाच आता बॉलिवूड ॲक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनंही तिची भूमिका मांडली आहे. तिनंही तिचा संताप व्यक्त केला आहे.

वेब सीरिजमधील एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कॉलेजमध्ये सुरू असणाऱ्या एका प्लेमध्ये मोहम्मद जीशान अयुब शंकराची भूमिका साकारताना दिसत आहे. परंतु हे खूप मजेदार अंदाजात दाखवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर तो शिवी देतानाही दिसत आहे.

अलीकडेच एका युजरनं भाजप आमदार कपिल मिश्रा यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हाच व्हिडीओ कंगनानं रिट्विट केला आहे. कंगनानं लिहिलं की, समस्या ही हिंदू फोटीक कंटेटची नाहीये. परंतु विधायक दृष्टीनंही खराब आहे. प्रत्येक लेवलवर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त सीन ठेवण्यात आले आहेत. तेही जाणूनबुजून. त्यांना प्रेक्षकांना टॉर्चर केल्याबद्दल आणि गुन्हेगारी हेतूसाठी जेलमध्ये टाकलं पाहिजे.

कपिल मिश्रा यांनी अली अब्बास जफर यांच्या माफीनाम्याचं एक ट्विट केलं होतं. यात कपिल मिश्रा यांनी जफर यांना असा सवाल केला होता की, ते असं त्यांच्या धर्मासोबत करू शकतात का. मिश्रा म्हणाले की, अली अब्बास जफर जी, कधी आपल्या धर्मावर मुव्ही बनवून देखील माफी मागा. सर्व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आमच्याच धर्माबाबत का. आपल्याही इष्टचा खराब विनोद करूनही कधी लाजिरवाणं व्हा. तुमच्या गुन्ह्यांचा हिशोब भारताचा कायदा करेल. विषारी कंटेट माघारी घ्या. तांडव हवायलाच लागेल.

कंगनानं मिश्रा यांचं हेच ट्विट रिट्विट करत लिहिलं की, माफी मागण्यासाठी राहणारच काय आहे ? हे तर थेट गळा कापतात. जिहादी देश फतवा काढतात. लिब्रु मीडिया व्हर्चुअल लिचिंग करतात. तुम्हाला ना फक्त मारलं जाईल तर मृत्यूनंतर त्याला जस्टिफाय केलं जाईल. सांगा अली अब्बास जफर आहे का हिंमत अल्लाची चेष्टा करण्याची.