करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन पुन्हा वादात, गोव्याच्या मंत्र्याने जारी केला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन पुन्हा एकदा चर्चेत आहे. गोव्याच्या एका मंत्र्याने करण जोहरची चित्रपट निर्मिती कंपनी धर्मा प्रोडक्शन माफी मागा किंवा फाइन भरण्यासाठी तयार राहाण्यास सांगितले आहे. कंपनीवर आरोप आहे की, गोव्याच्या नेरुळमध्ये दीपिका पदुकोणच्या चित्रपटच्या शुटींगच्या दरम्यान त्यांनी ही जागा अस्वच्छ केली होती.

आता गोवा सरकारने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनला एका गावाच्या शेजारी शूटिंग करण्याच्या दरम्यान परिसरात घाण केल्याचा आरोप केल्यानंतर माफी मागण्यास सांगितले आहे, जर असे केले नाही तर त्यांच्यावर दंड लावण्याचा इशारा दिला आहे.

हा प्रकार चर्चेत तेव्हा आला, जेव्हा नेरूळच्या रहिवाशांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर आपलोड केला. यामध्ये दीपिका पदुकोणच्या चित्रपटाच्या क्रूवर आरोप केला आहे की, त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगनंतर कचरा तेथेच टाकून दिला. सोशल मीडियावर ही बातमी पसरल्यानंतर एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाने मंगळवारी धर्मा प्रोडक्शनच्या लाइन प्रोड्यूसरला एक कारणे दाखवा नोटीससुद्धा जारी केली आहे.

आता गोव्याचे वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्टर मायकल लोबो यांनी मंगळवारी म्हटले की, धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक किंवा मालकांनी गोव्याच्या रहिवाशांची माफी मागितली पाहिजे. त्यांनी हे ठिकाण अस्वच्छ केले आणि स्वच्छ न करता ते सोडून गेले. त्यांनी सांगितले की, फेसबुकवर माफी मागावी की हे चुकीने झाले आणि आपली चूक कबूल करावी, जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्यावर दंड लावला जाईल. यावर अभिनेत्री कंगना राणावतने सुद्धा कंपनीवर जोरदार टीका केली आहे. दीपिका पदुकोणच्या चित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीची महत्वाची भूमिका आहे.

You might also like