Video : ‘बेबो’ करीनानं घातला साधा स्वेटर, सर्वत्र होतेय किमतीची चर्चा ! तुम्हीही खरेदी करू शकता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमुर अली खानला (Taimur Ali Khan) भावंडं मिळणार आहे. करीना आपल्या अ‍ॅक्टिंगसोबत फॅशनसाठीही ओळखली जाते. चाहत्यांमध्ये तिच्या ड्रेसिंगला खूप पसंती मिळत असते. अलीकडेच करीनानं तैमुरसोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती पॉटरी करताना दिसली होती. यावेळीही तिच्या लुकची खूप चर्चा झाली होती.

लुकबद्दल बोलायचं झालं तर करीनानं ब्लॅक अँड रेड स्वेटर घातला होता. यावेळी अनेकांनी तिच्या लुकचं आणि स्वेटरचंही कौतुक केलं होतं. अनेकांना याच्या किमतीबद्दलही बरीच उत्सुकता होती. अनेकांनी कमेंट करत तशी प्रतिक्रियादेखील दिली होती.

ज्या चाहत्यांनी असा स्वेटर घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की, आता तेदेखील हा स्वेटर खरेदी करू शकतात. या स्वेटरची किंमत 2 हजारांच्या जवळपास आहे.

करीनाचा हा स्वेटर H&M चा आहे. हा स्वेटर सवलतीची रक्कम वजा करून 1599 रुपयांपर्यंत खरेदी केला जाऊ शकतो. चाहत्यांमध्ये करीनाच्या या स्वेटरची खूप चर्चा होताना दिसत आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टिस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमीर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

You might also like