Video : ‘इंदू की जवानी’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली कियारा ! फॅमिली आणि फ्रेंड सोबत केली समोसा पार्टी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) चा इंदू की जवानी (Indoo Ki Jawani) हा सिनेमा आज (शुक्रवार दि 11 डिसेंबर) थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कियारा देखील तिच्या सिनेमाला घेऊन खूप एक्साईटेड आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होतं ज्यानं खूप अटेंशन घेतलं होतं. आता कियारा फॅमिली सोबत सिनेमा पाहायला आली जिथं तिनं जोरदार समोसा पार्टी केली. सध्या तिच्या समोसा पार्टीचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे.

कियाराचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. यात ती फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत समोसा पार्टी करताना दिसत आहे. परंतु यामुळं ती काहींच्या निशाण्यावरही आली आहे. अनेकांनी तिला कोरोना प्रोटोकॉल फॉलो न केल्यानं ऐकवलं आहे. सोबतच तिनं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं असा सल्लाही तिला दिला आहे.

इंदू की जवानी सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात कियारा आदित्य सील (Aditya Seal) सोबत दिसणार आहे. अबीर सेनगुप्ता यानं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. कियारानं सोशलवर सिनेमाचं प्रमोशन केलं आहे.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुडन्यूजनंतर आता तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. नुकतीच ती इंदू की जवानी मध्ये झळकली आहे. आता ती भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जिय हा सनेमाही आहे. नुकताच तिचा लक्ष्मी हा सिनेमा रिलीज ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.