जान कुमारनं केलेल्या आरोपांवर कुमार सानूंनी दिली प्रतिक्रिया ! म्हणाले ‘आता मुलाला कधीच नाही भेटणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंगर जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. आता बाहेर येताच तो खासगी लाईफमुळं चर्चेत येताना दिसत आहे. वडील कुमार सानू (Kumar Sanu) यांनी कधीच माझी आणि आईची जबाबदारी घेतली नाही असं जान म्हणाला होता. यावर आता कुमार सानू यांनी मौन सोडलं आहे. मुलाच्या अशा बोलण्यानं ते दुःखी आहेत. जर तो म्हणत असेल की, मी काहीच नाही केलं, तर माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे, असं कुमार सानू म्हणाले आहेत.

जे मागितलं ते दिलं
कुमार सानू म्हणाले, तो खूप लहान होता. त्यामुळं त्याला माहीतच नाही की, 2001 मध्ये माझा घटस्फोट झाला होता तेव्हा मी त्याच्या आईनं मागितलेली प्रत्येक गोष्ट दिली. तिनं कोर्टाद्वारे जे काही मागितलं ते सर्व. माझा बंगला आशिकी तोही दिला. माझा मुलगा मला भेटत होता. परंतु आता त्याची इच्छा असली तरीही मी त्याला भेटणार नाही.

कोरोनाशी लढत होतो, तरीही नाही आला कॉल
ते म्हणाले, आता तुम्हीच सांगा काय नावाशिवाय मी त्याला काहीच नाही दिलं का. त्याच्यासाठी काहीच नाही केलं ? तो एवढा मोठा झाला, कसा झाला ? तो तेव्हा खूप लहान होता. घरात कमावणारं कुणीच नव्हतं. त्यामुळं आता मी हे सगळं ऐकल्यानंतर मला वाईट वाटत आहे. एवढंच नाही तर जेव्हा मला कोरोना झाला तेव्हा मला घरून एकही कॉल आला नाही. आतापर्यंत नाही. जाननंदेखील मला अद्याप काही विचारपूस केली नाही. प्रेम एकतर्फी नसतं आणि टाळी एका हातानं नाही वाजत असंही ते म्हणाले.

You might also like