Poonam Pandey Arrest : खुलेआम अश्लील व्हिडिओ शूट केल्याच्या प्रकरणात ‘अ‍ॅक्ट्रेस’ पूनम पांडे अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेहमी वादात राहाणारी अभिनेत्री पूनम पांडेला गोवा पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. तिच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ शूट करण्याचा आरोप लावण्यात आला होता आणि तिच्या विरोधात गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला आघाडीने तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर आज गोवा पोलिसांनी तिला अटक केली आहे.

बुधवारी गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला आघाडीने अभिनेत्री पूनम पांडेविरूद्ध तक्रार दाखल केली होती. पूनम पांडेच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारी म्हटले आहे की, ती गोवाच्या चमोली धरणामध्ये खुलेआम अश्लील व्हिडिओ शूट करत होती. याशिवाय पूनम पांडेच्या अश्लील व्हिडिओबाबत एका अज्ञात व्यक्तीने सुद्धा कॅनाकोना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर चौकशी करून पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हरकती करण्याच्या आरोपात पूनम पांडेला अटक केली.

मात्र, पूनम पांडे वादात सापडल्याचे हे काही नवीन प्रकरण नाही. यापूर्वी तिने पती सॅम बॉम्बे विरोधात पोलिसात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. प्रकरण नोंदवल्यानंतर काही दिवसांनी तिने व्हिडिओ शूट करून सांगितले की, आता सर्व ठीक आहे.

तर कोरोना व्हायरसमुळे लावलेल्या लॉकडाऊन दरम्यान पूनम पांडे आणि सॅम बॉम्बेला लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पूनम पांडले नेहमीच सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि छायाचित्र टाकत असते.