लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा एकदा 3 आठवड्यांचा Lockdown ! रिकामे रस्ते पाहून प्रीती झिंटा म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगातील अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसचा कहर अजूनही कायम आहे. अशात लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा एकदा 3 आठवड्यांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रीती झिंटा (Preity Zinta) हिनं पतीसोबत फोटो शेअर करत यावर हैराणी व्यक्त केली आहे. फोटोत दोघांनी मास्क घातल्याचं दिसत आहे आणि रिकामे रस्ते दिसत आहेत. सध्या प्रीतीचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्रीतीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती मास्क घालून पतीसोबत दिसत आहे. फोटो सोबत तिनं लिहिलं की, लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा एकदा 3 आठवड्यांसाठी लॉकडाउन आहे. त्यामुळं रस्ते पुन्हा एकदा रिकामे दिसत आहेत. तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. सोबतच मास्क नक्की घाला.

प्रीतीच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर झिंटानं जीन गुडइनफ सोबत 2016 साली लग्न केलं होतं. दोघंही आता लॉस एंजेलिसमध्ये राहतात.

प्रीतीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रीतीचे अनेक चाहतेही या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी तिची काळजी व्यक्त केली आहे. काहींनी तिला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

You might also like