Priyanka Chopra ने सुरू केले फॅमिली प्लॅनिंग, तिला बनायचंय 11 मुलांची आई

मुंबई : बॉलीवुड आणि हॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपले सौंदर्य आणि बोल्डनेससह बोलण्यातूनही चाहत्यांचे मन जिंकत असते. प्रियंका कधीही आपल्या मनातील बोलायला मागे-पुढे पहात नाही. मग ती कोणतीही गोष्ट असो, ती खुलेपणाने सर्वांसमोर ठेवते. प्रियंका आपला पती निक जोन्स सोबतच्या आपल्या नात्यावरही बोलत असते. नुकतेच प्रियंका चोपडाने (Priyanka Chopra) आपल्या फॅमिली प्लॅनिंगचा सुद्धा खुलासा केला आहे.

प्रियंका चोपडाने एका मुलाखतीमध्ये म्हटले की, तिला 11 मुलांची आई व्हायचे आहे. तिचे म्हणणे आहे की, तिला स्वत:ची एक क्रिकेट टीम बनवायची आहे. संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही इच्छा जाहीर केली. प्रियंका चोपडाला जेव्हा विचारले की, तिला किती मुले हवी आहेत. तेव्हा तिने जे उत्तर दिले त्यामुळे अनेकजण हैराण झाले.

38 वर्षीय अभिनेत्रीने म्हटले की, तिला 11 मुले हवी आहेत म्हणजे प्रियंकाला 11 मुलांची आई व्हायचे आहे. हे उत्तर देऊन प्रियंका जोर-जोरात हसू लागली. यानंतर तिने म्हटले की, तिला एक क्रिकेट टीम बनवायची आहे आणि यासाठी तिला 11 मुले हवी आहेत. मात्र, यानंतर आपले बोलणे सावरत तिने म्हटले की, 11 मुलं बहुतेक खुपच जास्त होतील. तसेच यावेळी तिने आपला पती निक जोन्ससोबतच्या आपल्या नात्यावर सुद्धा संवाद साधला.