‘लॉकडॉऊन’मध्येदेखील राणा डग्गुबाती-मिहिका बजाज यांच्या साखरपुड्यासाठी आले होते ‘हे’ स्टार्स ! समोर आले फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबली मध्ये भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबाती यानं गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत साखरपुडा केला आहे. अलीकडेच त्यानं इंस्टावरून साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते. त्याचे फोटो पाहून सारेच चकित झाले होते. यानंतर आता त्याच्या साखरपुड्याच्या समारंभारत सहभागी झालेल्या गेस्टचे फोटो समोर आले आहेत. हे गेस्ट राणा आणि मिहिकाचे खास दोस्त सामंथा अक्किनेनी आणि तिचा पती नागा चैतन्य आहेत.

असं सांगितलं जातं की, राणा डग्गुबाती-मिहिका बजाज आणि सामंथा-नागा चैतन्य हे चौघेजण खूप खास मित्र आहेत. हेच कारण आहे की, लॉकडाऊन असूनही दोघंही राणा आणि मिहिका यांच्या खास दिवशी समारंभात पोहोचले. अलीकडेच सामंथानं तिच्या इंस्टा स्टोरील काही फोटो शेअर केले आहेत.

राणा आणि मिहिकाच्या सेरेमनीमधील खाही फोटोही सामंथानं इंस्टावरून शेअर केले आहेत फोटो शेअर करताना तिनं लिहिलं की, “राणा आणि मिहिका 2020 ची बेस्ट बातमी देण्यासाठी तुमचे धन्यावाद. तुम्ही दोघं कायम खुश रहा.” याशिवाय सामंथानं पती नागा चैतन्यचेही फोटो शेअर केले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like