करीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता ‘हा’ सल्ला ! अनेक वर्षांनंतर स्वत:च केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुण येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करीना तिचा प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. सैफ आणि करीना अधून मधून त्यांच्या नात्यावर भाष्य करत असतात किंवा जुन्या काही गोष्ट सांगत असतात ज्यामुळं ते चर्चेत येतात. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे.

करीना सोबत लग्न करण्यापूर्वी ॲक्ट्रेस राणी मुखर्जी हिनं सैफ अली खानला एक सल्ला दिला होता. खुद्द सैफनंच करीनाच्या टॉक शोमध्ये याचा खुलासा केला आहे. जेव्हा मी करीनाला डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा राणीनं मला जबाबदारी बद्दल एक सल्ला दिला होता असं त्यानं सागितलं आहे.

या टॉक शोमध्ये बोलताना सैफ म्हणाला, मला आजही आठवतंय, जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा राणी मला म्हणाली होती की, तू असं बिहेव कर जसं तू एका लेडीसोबत नाही, तर जेन्ट्स सोबत नात्यात आहे. राणीला मला काय समजवायचं होतं ते मला चांगलंच माहिती होतं.

टॉक शोमध्ये पुढं बोलताना सैफ म्हणाला की, तिचा सांगण्याच अर्थ असा होता की, तू रिलेशनशिपच्या जेंडरवर अजिबात जाऊ नकोस. कायम एकमेकांसोबत बरोबरीची भागिदारी समज. दोघांनी असं समजा की, घरात दोघंही मेन आहेत. असं केल्यानं दोघांनाही अडचण होणार नाही. मला असं वाटतं की, तिचं म्हणणं बरोबर होतं. असंही सैफनं यावेळी स्पष्ट केलं.

सैफ आणि करीनाच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर 2009 साली सैफ आणि करीना आपल्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत रहात होते. 2012 साली सैफ आणि करीना यांनी लग्न केलं होतं. टशन या सिनेमाच्या शुटींगजदरम्यान त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो बंटी और बबली आणि भूत पोलीस सिनेमात काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर प्रभास आणि कृती सेननच्या आदिपुरुष या सिनेमातही तो झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तो तान्हाजी सिनेमानंतर जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. नुकतीच त्याची तांडव ही वेब सीरिज देखील रिलीज झाली आहे. याशिवाय त्यानं कलाकांडी, शेफ, लाल कप्तान अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.