इब्राहिमनं ‘या’ अभिनेत्यासारखी धमाकेदार बॉलिवूड एन्ट्री करावी : सैफ अली खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुण येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमुर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सैफची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) हिची बॉलिवूड एन्ट्री झाली आहे. आता इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) च्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरू आहे. यावर आता सैफनंही मौन सोडलं आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सैफनं सांगितलं की, मुलगा इब्राहिमची सुरुवात अभिनेता हृतिक रोशन सारखी (Hrithik Roshan) व्हावी. तो म्हणाला, मला वाटतं की, हृतिकनं बॉलिवूडमध्ये जशी धमाकेदार एन्ट्री घेतली होती. तसाच धमाका इब्राहिम अली खाननं करावा.

सैफ म्हणाला, त्याच्यापासून तुलना करण्यापासून इब्राहिम वाचणार नाही. परंतु तो त्याची वेगळी पर्सनॅलिटी बनवत आहे. आता तो कमीत कमी दिसला तर तेच चांगलं राहिल. अजून त्याला खूप काही शिकायचं आहे. सोशल मीडियापासून त्यानं दूर राहायला पाहिजे. वेळ आल्यावर स्क्रीनवर येऊन धमाका करायला पाहिजे. हे ठीकच असेल कारण आम्ही मोठ्या स्क्रीनवर एक नवा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहोत.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो बंटी और बबली आणि भूत पोलीस सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय आता त्याच्याकडे तांडव ही वेब सीरिजदेखील आहे. प्रभास आणि कृती सेननच्या आदिपुरुष या सिनेमातही तो झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तो तान्हाजी सिनेमानंतर जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. याशिवाय त्यानं कलाकांडी, शेफ, लाल कप्तान अशा काही सिनेमातही काम केलं आहे.

You might also like