पुन्हा शेतात राबताना दिसला ‘भाईजान’ सलमान ! फोटो शेअर करत म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. हा फोटो सलमाननंच सोशलवर शेअर केला आहे. सध्या या फोटोची खूप चर्चा होत आहे. सलमान खान शेतात दिसत आहे. हातात फावडं घेऊन तो काम करत आहे.

सलमाननं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो हातात फावडं घेऊन शेतात काम करताना दिसत आहे. लॉकडाऊनपासून सलमान खान त्याच्या पनवेल मधील शेतात राबत आहे. फोटो शेअर करताना त्यानं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये सलमान म्हणतो, धरती मां.

लॉकडाऊनपासूनच सलमान शेतात काम करताना दिसत आहे. याआधीही त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्या तो ट्रॅक्टर घेऊन शेतात नांगरणी करताना दिसला होता.

सध्या सलमान खानचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.