Video : ट्रॅक्टर चालवत नांगरणी करताना दिसला ‘भाईजान’ सलमान ! प्रचंड व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान याचा एक फोटो अलीकडेच सोशलवर व्हायरल झाला होता. हा फोटो सलमाननंच सोशलवर शेअर केला होता. या फोटोची खूप चर्चा झाली होती. सलमान खान शेतात उभा आहे असं यात दिसतं होतं. यानंतर आता सलमान खानचा ट्रॅक्टर चावलत नांगरणी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. सलमान गेल्या 3 महिन्यांपासून त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. इथून त्यानं काही गाणीही शुट केली आहेत.

सलमाननं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमान खान शेतीच्या कामात व्यस्त दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो स्वत: ट्रॅक्टर चालवत नांगरणी करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना सलमान म्हणतो, “फार्मिंग.”

लुकबद्दल बोलायचं झालं तर हाफ पँट आणि सिंपल लुकमध्ये तो दिसत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही.