‘किंग’ शाहरुख खानचा अभिनेत्रीसोबत मस्ती करताना २७ वर्षांपू्र्वीचा फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांनी आवाज दिलेला ‘द लायन किंग’ या सिनेमाचा टीजर नुकताच समोर आला आहे. इंडस्ट्रीत २७ वर्षे पूर्ण करणाऱ्या शाहरुखला सुरुवातीच्या काळात खूपच स्ट्रगल करावा लागला होता. त्याच्या स्ट्रगलदरम्यानचा एक फोटो सध्या समोर आला आहे. जो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत तो आपल्या को-अ‍ॅक्ट्रेससोबत मस्ती करताना दिसत आहे.

शाहरुख खानच्या फॅन क्लबकडून शाहरुखचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘चमत्कार’ या सिनेमातील शाहरुखचा हा फोटो आहे. हा सिनेमा १९९२ साली रिलीज झाला होता. या सिनेमात त्याची को-अ‍ॅक्ट्रेस उर्मिला मातोंडकरही या फोटोत दिसत आहे. फॅन क्लबने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “शाहरुख खानचा हा फोटो कोणत्या सिनेमातील शुटींगदरम्यान आहे हे तुम्ही ओळखू शकता का?”

 

या सिनेमात शाहरुख आणि उर्मिला व्यतिरीक्त नसीरूद्दीन शहादेखील प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. परंतु या सिनेमातील गाणे खूपच गाजले. आजही हे गाणे खूपच पसंत केले जात आहेत. या सिनेमातील शाहरुख खानच्या अ‍ॅक्टींगचे खूपच कौतुक होताना दिसले.

झिरो या सिनेमानंतर शाहरुखने अद्याप कोणता सिनेमा साईन केलेला नाही. परंतु ‘आर्यन खान’ मात्र १९ जुलै रोजी डेब्यू करणार आहे. त्याच्या आवाजाने सजलेला ‘द लायन किंग’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहरुखनेही आपला आवाज दिला आहे. सध्या शाहरुख परिवारासोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

You might also like