शाहरूख खानची मुलगी सुहानाला मिळाला ‘हा’ बहुमान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या स्टाइलमुळे नेहमीच सगळ्यांच्या चर्चेत असते. सुहाना खान सध्या सोशल मीडियाच्या चर्चेत आहे. सुहाना खानचे फॅन फॉलोविंग एखाद्या बॉलीवूड स्टार पेक्षा कमी नाही. सगळ्यांना सुहाना खानच्या संबंधित सगळ्यात लहान गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. नुकतीच सुहाना खान ग्रॅजुएट झाली आहे. ग्रॅजुएशन सेरेमनीच्या वेळी आई गौरी खान आणि वडील शाहरुख खानसोबत सुहानाचा फोटो समोर आला आहे. त्यासोबतच तिला कॉलेज मधून एक अवॉर्ड देखील भेटला आहे. सुहानाने लंडन मधील Ardingly College मध्ये आपले ग्रॅजुएशन पूर्ण केले.

यावेळी वडील शाहरुख खान आणि आई गौरी खान पण उपस्थित होते. सुहाना खानची आई गौरी खानने खुलासा केला की, तिची मुलगी सुहाना खान ऑफिशयली ग्रॅजुएट झाली आहे. एवढच नव्हे तर तिला कॉलेज कडून सम्मानित देखील केले आहे. सुहाना खान कॉलेज मध्ये ड्रामा एक्टिविटीज मध्ये नेहमी भाग घेत असत. सुहानाला या गोष्टीमुळे सम्मानित करण्यात आले.

शाहरुख खानने गौरी आणि सुहाना सोबत फोटो शेयर करत लिहिले की, 4 yrs have flown by. Graduating from Ardingly.  Last pizza…last train ride…and first step into the real world…school ends…learning doesn’t. तसेच गौरी खानने सुहाना खान अवॉर्ड घेतांनाचा व्हिडीओ शेयर केला आहे. गौरी खानने लिहिले की, शाळेत शेवटचा दिवस … पुढच्या आयुष्यात नवीन रंग आणि अनुभव जोडले जातील.

Video : पती सैफ अली खानच्या गाण्यावर ‘बेबो’ करिना कपूरचा ‘जलवा’

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

पाच सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे वजन होईल कमी

 

Loading...
You might also like