सोनम कपूर एकाच घरात राहून सासूपासून ठेवतेय अंतर, ‘अशी’ करते ‘बातचित’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सोनम कपूर एक दिवसआधीच तिचा पती आनंद आहुजासोबत लंडनहून परतली आहे. सोनम आणि आनंद थेट आपल्या घरी आले. आल्यानंतर तिनं पतीच्या कुटुंबियांपासून अंतर ठेवलं आहे. कोरोनाच्या भीतीपोटी त्यांनी असं पाऊल टाकलं आहे. दोघंही आपल्या घरातच आहेत. एवढंच काय तर त्यांचं जेवणंही त्यांच्या रूममध्ये पाठवलं जात आहे. अशात सोनम कपूरचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

सोनम कपूरच्या या ताज्या व्हिडीओत ती तिच्या सासूसोबत घराच्या खिडकीतून बोलताना दिसत आहे. सोनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनमच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पांढरा ड्रेस घातला आहे. घराच्या खिडकीत उभी राहून ती सासू प्रिया आहुजासोबत बोलताना दिसत आहे. चाहत्यांकडून सोनमचा हा व्हिडीओ वारंवार पाहिला जात आहे.

सोनमनं सांगितलं होतं की, आम्ही दोघंही घरी परतलो आहोत. आम्ही खूप खुश आहोत. आनंद आणि माझ्यात व्हायरसची कोणतीही लक्षण नाहीत असं दिसत आहे. आम्ही आमच्या पॅरेंट्स आणि आजीसोबत राहतो त्यामुळं आम्ही स्वत:ला सेल्फ क्वारंटाईन करत आहोत. सरकारला मदत करणं ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून आपण हा आजार पसरण्याापासून रोखू शकतो.” असंती तिनं सांगितलं होतं.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/B9RdB4bl9K3/

https://www.instagram.com/p/B9RcbfpFOCV/

https://www.instagram.com/p/B9AR7erlOr8/