जान्हवी कपूरनंतर ‘श्रीदेवी’ची दुसरी मुलगी करणार सिनेमात ‘एन्ट्री’, पण वडिल बोनी कपूरनं…

बॉलिवूड ॲक्ट्रेस श्रीदेवी (Sridevi) आणि प्रोड्युसर बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री करून तिची वेगळी जागाही बनवली आहे. गेल्या अनेक दिवसपांसून बोनी आणि श्रीदेवी याची लहान मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) हिच्या डेब्यू बद्दल चर्चा सुरू होती. खुशी लवकरच आता सिनेमात एन्ट्री करू शकते. खुद्द तिच्या वडिलांनीच याची पुष्टी केली आहे. लवकरच आता खुशीच्या एन्ट्रीची मोठी अनाऊंसमेंट होणार आहे.

एका वृत्तपत्रासोबत बोलताना बोनी कपूर यांनी आपल्या मुलीच्या प्लॅन्सबद्दल सांगितलं आहे. बोनी कपूर म्हणाले, होय खुशीलाही ॲक्टींगची खूप आवड आहे. तुम्ही लवकरच याच्याशी संबंधित एक मोठी अनाऊंसमेंट ऐकणार आहात. खास बात अशी आहे की, स्वत: प्रोड्युसर असूनही ते आपल्या मुलीला लाँच करणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं आहे.

खुशीला लाँच न करण्याबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले की, त्यांची इच्छा आहे की, खुशीला दुसरं कुणतीरी लाँच करावं. कारण एक वडिल म्हणून ते खूप जोडले जातात. एक फिल्ममेकर या नात्यानं असं होता कामा नये. मला वाटतं की, मी संजयला लाँच करतानाही खूप जोडला गेलो होतो जे त्याच्यासाठी चांगलं नाही ठरलं.

बोनी कपूर यांनी त्यांचा भाऊ संजय कपूरला प्रेम या सिनेमातून लाँच केलं होतं. या सिनेमात त्याच्या सोबत तबूही झळकली होती.