कॅटरिना, प्रियांकासह ‘या’ बड्या स्टारच्या घरावर पडला होता IT चा छापा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने दक्षिण अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरावर छापा टाकला होता. बंगळुरुहून इनकम टॅक्स अधिकाऱ्यांची टीम सकाळी 7.30 च्या सुमारास तिच्या घरी पोहोचली. रश्मिका ही दक्षिणची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रश्मिकाने या अफवांना खोटे असल्याचे सांगितले होते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्टार अभिनेत्याच्या घरी छापा टाकण्याची ही पहिली वेळ नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत अशा घटना घडल्या आहे. चला

तर मग जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल……
2011 मध्ये आयकर विभागाने कॅटरिना कैफच्या घरी छापा टाकला होता. तिच्याकडे अधिक मालमत्ता ठेवण्याचा आरोपही होता. या प्रकरणात कॅटरिनावरही बरीच चौकशी केली गेली होती. एका अहवालानुसार, तिने इनकम टॅक्स रिर्टन फाईल भरताना चुकीची माहिती दिली होती आणि उत्पन्नाविषयीही देखील संपूर्ण माहिती दिली नव्हती. तिने पैसे लपवून ठेवल्याचीही माहिती समोर आली होती.

एकता कपूरचा ‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयकर अधिकाऱ्यांनी तिच्या घरी छापा टाकला होता. वृत्तानुसार या कामासाठी 100 अधिकारी दाखल झाले होते आणि एकताच्या घराबरोबरच बालाजी टेलीफिल्म्स स्टुडिओवरही छापा टाकण्यात आला होता.

2011 मध्येच प्रियंका चोप्राच्या घरी आयटी विभागाने छापा टाकला होता. या छापानंतर तिच्या घरातून काही बेनामी मालमत्ताही उघडकीस आली होती. ही चर्चा खूप वाढली होती कारण सकाळी विभागातील अधिकारी प्रियंकाच्या घरावर छापा टाकायला आले तेव्हा शाहिद कपूर यांनी दरवाजा उघडला होता. त्यावेळी शाहिद आणि प्रियांका एकमेकांना डेट करत होते.

View this post on Instagram

💗

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

सोनू निगम यांच्या घरावर आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. रिपोर्ट्सनुसार सोनूच्या घराबाहेर उभ्या असलेल्या लक्झरी कारची लाईन पाहिल्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली होती.

सलमान खानच्या अनेक चित्रपटांची निर्माती करणारे साजिद नाडियाडवाला यांच्याही घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे, त्यावेळी ते म्हणाले की, ही गंभीर बाब नाही तर नियमित तपासणी आहे.

सुपरस्टार सलमान खानच्या फार्महाऊसवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. सन 2000 मध्ये सलमानच्या पनवेल फॉर्मवर छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणात सलमान व्यतिरिक्त त्याचा भाऊ अरबाज खान याच्यावरही कडक चौकशी केली गेली होती. त्या काळात सलमानवर अधिक मालमत्ता असल्याचा आरोप होता.

View this post on Instagram

Promotions chalu! #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सन 2000 मध्ये आयकर विभागाने अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्याही घरी छापा टाकला होता. यावेळी राणीच्या घरातून 12 लाख रुपये सील केले होते. त्यावेळी राणीला बॉलिवूडची सर्वोच्च अभिनेत्री मानली जात होते.

View this post on Instagram

#Hichki #promotions #nofilter

A post shared by Rani Mukerji Chopra (@ranimukerji_official) on

2010 मध्ये आयकर विभागाने दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या घरावरही छापा टाकला होता.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like