दीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे का मादक पदार्थांचे व्यसन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकला, अनेक इतर खुलासे होऊ लागलेत. मायानगरीचे अनेक मोठे तारे ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकत असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये सर्वात मोठे नाव आहे दीपिका पदुकोणचे. बॉलीवुडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी दीपिका डिप्रेशनच्या विळख्यात सुद्धा अडकली होती. यातून प्रश्न हा निर्माण होतो की, डिप्रेशन आणि ड्रग्जमध्ये काही कनेक्शन आहे का? दीपिकाने स्वत: मान्य केले होते की, तिच्या जीवनात 2014 वर्ष वाईट होते.

पडद्यावरची कथा केव्हा खर्‍या जीवनात आली, हे समजलेच नाही. 2011 मध्ये दीपिकाची फिल्म दम मारो दम आली होती आणि अगदी याच्या तीन वर्षानंतर दीपिकाच्या खर्‍या आयुष्यात उलथा-पालथ झाली. दीपिका डिप्रेशनमध्ये गेली. कुणाला विश्वासच बसत नव्हता की इतक्या यशस्वी स्टारला हे काय झाले होते. आजतकवर दीपिकाने हे रहस्य उघड केले होते.

याच वर्षी दावोसमध्ये दीपिकाला मेंटल हेल्थवर जागरूकता निर्माण करण्यासाठी क्रिस्टल अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात आले. एवढेच नव्हे, जूनमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दीपिकाने एक ट्विट करून म्हटले होते की, माझ्यासोबत बोला. तुम्ही डिप्रेशनकडे पाठ फिरवू शकत नाही.

परंतु, दीपिकाचे ड्रग्ज चॅट समोर येताच, डिप्रेशन आणि ड्रग्जचे कनेक्शन शोधले जाऊ लागले. कंगनाने तर या कॉकटेलवर जोरदार प्रहार केला. पण ड्रिप्रेशनवर बोलणारी दीपिका ड्रग्जवर शांत झाली. परंतु आता तिला तपास एजन्सीज समोर तर बोलावेच लागेल. दीपिकाला सांगावे लागेल की, हे हॅश काय आहे? माल म्हणजे काय?

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ड्रग्स चॅटवरून दीपिकाभोवती फास आवळत आहे. एनसीबी दीपिकावर अनेक सेक्शन लावू शकते. उदाहरणार्थ –
सेक्शन 8 (सी) : म्हणजे प्रतिबंधित वस्तू खरेदी आणि वापरणे.
सेक्शन 20 (बी) (ळळ) : ड्रग्ज बनवणे, बाळगणे, विकणे, खरेदी किंवा वापरताना आढळणे.
सेक्शन 27 (ए) : प्रतिबंधित ड्रग्जशी संबंधित हालचालींना प्रोत्साहन देणे.

परंतु, यासाठी एनसीबीला सिद्ध करावे लागेल की, दीपिकाने प्रतिबंधित ड्रग्ज खरेदी केले होते. त्याचे पैसे भरले होते आणि ट्रान्सपोर्ट केले होते. या प्रश्नांपूर्वी एनसीबीला सुद्धा पूर्वतयारी करायची आहे. यासाठी अगोदर त्यांच्या निशाण्यावर आहे, क्वान कंपनीचा मालिक, सीईओ-ध्रुव आणि मॅनेजर जया साहा आणि करिश्मा. त्यांच्याकडे लागोपाठ एनसीबी चौकशी करत आहे. लवकरच या प्रकरणी मोठे खुलासे होतील, असे दिसत आहे.