SSR Death Case : सुशांतची मैत्रीण स्मिता पारीखचा आरोप, ‘पेड पीआर करतायेत आवाज दडपण्याचा प्रयत्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी अद्याप सुरू आहे. सुशांतची मैत्रीण स्मिता पारीखने नुकताच सोशल मीडियावर खुलासा केला की पेड पीआर तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर केंद्र सरकारतर्फे बिहार सरकारच्या विनंतीवरून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर बरेच खुलासे झाले आहेत. त्याच वेळी, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही या तपासणीत भाग घेतला आणि कार्यालयात फोन करून अनेक लोकांची चौकशी केली, तर रिया चक्रवर्तीला देखील तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्ज नेक्ससमधील संबंध पुन्हा एकदा समोर आला आहे. सीबीआय अजूनही प्रकरणाचा तपास करीत आहे

सुशांतची मैत्रीण स्मिताने आता खुलासा केला की, तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिने असेही म्हंटले कि, जेव्हा हे प्रकरण कोर्टात जाईल, तेव्हा सुशांतच्या विरोधकांना एक चापट बसणार आहे. तिने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “जेव्हापासून मी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात लढाई लढत आहे. तेव्हापासून पेड पीआरकडे एकच काम आहे कि, ते माझा आवाज दडपू शकतील. मी माझे काम केले आहे आणि सीबीआयला पुरावे दिले आहेत, त्यामुळे माझा आवाज बंद करून काहीही होणार नाही आणि जेव्हा हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचेल. तेव्हा संपूर्ण पीआर टीमला जोरदार चापट बसेल.

या व्यतिरिक्त तिने लिहिले की, ‘कोणाच्यातरी हत्येवर अनेकजण व्हिडिओ बनवित आहेत. आपल्याकडे पुरावे असल्यास त्यांनी पुढे येऊन सीबीआयकडे द्यावे. सुशांतसिंह राजपूत यांच्या समर्थकांमध्येही लोकांना फूट निर्माण करायची आहे. मी त्यांना विनंती करते कि, त्यांनी सीबीआयकडे जावे आणि आपली बाजू मांडावी, त्याचवेळी सुशांतची सहकारी अभिनेत्री सपना पब्बी यांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांतसिंह राजपूत 14 जून रोजी घरात मृतावस्थेत सापडला होता.