रिया आणि श्रुतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते सुशांतचे वडील, समोर आले WhatsApp ‘चॅट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी आता अधिक तीव्र झाली आहे. या प्रकरणात, एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. त्यात आता आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह सतत श्रुती मोदी, रिया चक्रवर्ती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. ही गोष्ट त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून उघडकीस आली आहे. चॅट वाचताना असे दिसून येते की सुशांतवर होणाऱ्या उपचारांबद्दल कुटुंबाला काहीही सांगितले गेले नव्हते.

सुशांतच्या वडिलांनी रियाला मॅसेजमध्ये लिहिले की, “जेव्हा तुला माहित आहे कि, मी सुशांतचा बाप आहे, तर तू माझ्याशी बोलत का नाहीस? मला कॉल कर ” तू मैत्रीण म्हणून सुशांतची काळजी घेत आहेस, त्याचा उपचार करत आहे, त्यामुळे माझे देखील कर्तव्य आहे कि, त्याच्या उपचारांबद्दल मला सर्व काही माहित असले पाहिजे. म्हणून फोन करुन मला माहिती दे.

त्याच बरोबर त्यांनी श्रुतीला एक मॅसेज लिहिला, ज्यात म्हंटले कि, ‘मला माहित आहे तू सुशांतची सर कर्जे आणि त्यालाही सांभाळत आहे. तो सध्या कोणत्या परिस्थितीत आहे याविषयी बोलण्याचा प्रयत्न करीत होतो. मी सुशांतशी बोललो तेव्हा त्याने सांगितले की तो खूप अस्वस्थ आहे. मग विचार कर एक बाप म्हणून मला किती काळजी असेल. म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचे आहे जर तू बोलत नसशील तर मला मुंबईला यायचे आहे, एक विमानाचे तिकीट पाठवून दे.

यापूर्वी सुशांत नावाने नोंदणीकृत कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस सतत बदलत असल्याचे समोर आले होते. नवी मुंबईच्या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस ज्यात सुशांतसिंग राजपूत रिया चक्रवर्ती डायरेक्टर होते, आयपी अ‍ॅड्रेस 23 जून 2020 ते 7 ऑगस्ट दरम्यान 3 वेळा बदलला होता. तर आत्तापर्यंत या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस 17 वेळा बदलला आहे.

पुराव्यांसह करण्यात आली छेडछाड तज्ज्ञांचा संशय
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आयपी अ‍ॅड्रेस वारंवार बदलणे सामान्य नाही. जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉनिक पुरावा मिटवावा लागेल तेव्हा हे केले जाते. या प्रकरणात, सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई पोलिसांच्या कारभारावर सतत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. दरम्यान, बिहार सरकारच्या मागणीनंतर केंद्राने त्याच्या सीबीआय चौकशीस मान्यता दिली आहे. सीबीआयनेही या प्रकरणात एफआयआर नोंदविला आहे. लवकरच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबई गाठू शकेल असा विश्वास आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like