ट्रोलर म्हणाला ‘फालतू हिरोईन’ ! तापसी पन्नूनं दिलं जशास तसं उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं तिच्या आगामी सिनेमाची शूटिंग सुरू केली आहे. रश्मी रॅकेट (Rashmi Rocket) असं या सिनेमाचं नाव आहे. अलीकडेच तापसीनं या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. सिनेमात तापसी अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच तापसी सोशलवर ट्रोल झाली ज्यानंतर तिनं याचं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. एकानं तापसीला फालतू हिरोईन म्हटलं. यावर अ‍ॅक्ट्रेसनं जे काही उत्तर दिलं त्यानंतर प्रत्येकजण तिची स्तुती करताना दिसत आहे.

तापसीनं तिच्या इंस्टा स्टोरीला एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात ती ट्रोलरसोबत बातचित करताना दिसत आहे. एकानं तिला म्हटलं की, तुला अ‍ॅक्टिंग तर येत नाही उचलून उचलून अ‍ॅक्टिंग करतेस. यावर उत्तर देताना तापसीनं लिहिलं की, बरोबर आहे. उचललं तर खूप काही आहे मी, स्टँडर्ड परंतु तुझ्या बहुतेक लक्षात येणार नाही.

तापसीनं तिच्या स्टोरीला हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या. काहींनी तर तिनं दिलेल्या प्रत्युत्तराचं कौतुकही केलं.

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठूमध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरुबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.

You might also like