Video : घरासमोर आलेल्या ‘गो-सेवका’नं वाजवलं सैफ अली खानचं हिट साँग ! तैमूर म्हणाला – ‘और बजाओ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा लाडका तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आपल्या क्युटनेसमुळं नेहमीच चर्चेत येत असतो. त्याचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ नेहमीच सोशलवर व्हायरल होत असतो. पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडीओमुळं तैमूर चर्चेत आला आहे. सध्या या व्हिडीओची खूप चर्चा होताना दिसत आहे.

एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक गो सेवक आपल्या गाईला घेऊन फॉर्च्युन हाईट्स निवासच्या समोर आला. यावेळी तैमूरही चकित झाला आणि दोन्ही हात जोडून उभा राहिला. यावेळी त्या गो सेवकानं त्याला फिल्मी धून ऐकवली. ही ऐकून तैमूर खूप खुश झाला. हे एकून तैमूर म्हणाला और बजाओ, और बजाओ.

इतकंच नाही तर त्या गायीवाल्यानं पिपाणीवर सैफ अली खानचा हिट सिनेमा हम साथ साथ है मधील ये तो सच है की भगवान है गाणं आणि सैफवर शुट केलेलं ओले ओले हे गाणंही वाजवलं. व्हिडीओत गायीला पाहून तैमूरही हात जोडून उभा असल्याचं दिसत आहे. तैमूर हे सगळं पाहून खूप खुश झाला होता.

तैमूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तैमूरचा हा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी तैमूरचा असा अंदाज पाहून त्याचं कौतुक केलं आहे. त्याचा क्युटनेस चाहत्यांना कायमच आवडत असतो.