शेअर करताच तुफान व्हायरल झाले आमीर खानच्या लाडक्या इराचे फोटो ! स्वीमिंग पूलमध्ये दिसला Bold अवतार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार आमीर खान (Aamir Khan) ची लाडकी लेक इरा खान (Ira Khan) नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. लाईमलाईटपासून दूर असणारी इरा आपला वेळ आपले मित्र, कुटुंबीय किंवा अशा कामात घालवते जे केल्यानं तिला आनंद मिळेल. इरा जवळपास रोज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, की आपल्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. अलीकडेच इरा आपल्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली होती. अशी माहिती समोर आली होती की, इरा सध्या तिचा फिटनेस कोच नूपुर शिखर (Nupur Shikhare) ला डेट करत आहे. इरानं स्वीमिंग पूलमधील काही फोटोंमुळं पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

इरानं तिच्या इन्स्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची खास बात अशी की, या फोटोत ती ब्लॅक आणि यलो बिकिनीत दिसत आहे. इरा स्वीमिंग पूलमध्ये दिसत आहे.

इरा या लुकमध्ये खूपच बोल्ड अँड हॉट दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. सध्या इराचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

इराच्या अनेक चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. अनेकांनी तिला हॉट लुकसाठी कॉम्प्लिमेंट दिली आहे.

फोटो शेअर करताना इरानं खास कॅप्शनही दिलं आहे. मी आता ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा कामावर परतली आहे, असं ती म्हणाली आहे.

इराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तिनं डायरेक्शनमध्ये पदार्पण केलं आहे. इरानं ‘युरीपाईड्स मेडिया’ (‘Euripides Medea’) हे नाटक डायरेक्ट केलं आहे. अशी माहिती होती की, या नाटकातून सिक्सर किंग युवराजची पत्नी हेजल किच ही अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार होती.

https://www.instagram.com/p/B6Fig1BAmES/

https://www.instagram.com/p/B6FibRXAUQw/