अ‍ॅप्सवर बंदी आल्यानं खवळलेला चिनी पत्रकार उडवत होता खिल्ली, सेलिना जेटलीनं केली बोलती बंद !

पोलीसनामा ऑनलाइन – भारत सरकारनं नुकतेच 59 चायनीज अ‍ॅप्स बॅन केले आहेत. यानंतर आता काही चीनी लोक खवळताना दिसत आहेत. एका चिनी पत्रकारानं अ‍ॅप्सला बंदी घातल्याप्रकरणी भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिनेत्री सेलिना जेटलीनं त्याला जोरदार प्रत्युत्तर देत बोलती बंद केली आहे.

चिनी पत्रकार हू सायचिननं अ‍ॅप्स बॅन केल्याच्या बातमीवर बोलताना लिहिलं की, “जर चायनील लोकांची भारतीय उतपादन बॅन करण्याचा प्रयत्न केला तरी जास्त भारतीय उत्पादन दिसणार नाही. भारतीय मित्रांनो तुमच्या काही गोष्टी असायला हव्या होत्या ज्या राष्ट्रवादाहून अधिक असाव्यात.”

पत्रकाराच्या या ट्विटला सेलिना जेटलीनं प्रत्युत्त देत लिहिलं की, “सर तुम्ही आम्हाला मित्र म्हणालात का ? मित्र मित्राला मारत नाही. योग्य शब्द देशभक्ती आहे आणि फरक हा आहे की, आम्ही आमच्या देशासाठी मरायलाही तयार असतो. आम्ही जागतिकीकरण निवडलं आणि तुम्ही युद्ध. आता आमच्या एका शहिद जवानाची किंमत तुम्हाला अरबो रुपयांत मोजावी लागणार आहे. शांती.”

यानंतर काही तासांनी सेलिनानं आणखी एक ट्विट केलं. सेलिना म्हणाली, “आणखी एक सर, मला याची आठवण करू द्यायची आहे की, तुम्ही भारतातील खूप महत्त्वाच्या भारतीय निर्यातीला विसरत आहात. ज्यानं शतकानुशतके तुमच्या संस्कृतीला आकार दिला आहे. त्याचं नाव आहे बुद्धीजम. आता तुम्ही विचार करण्यासाठी वेळ काढू शकता.”

सेलिनाच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर ती एका आर्मी कुटुंबातून आहे. तिचे वडिल कर्नल व्हीके जेटली एक वॉर हिरो होते. तिचा भाऊदेखील इंडियन आर्मीत आहे. सेलिना देखील टिकटॉकचा वापर करत होती.

सेलिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं सीजन्स ग्रीटींग या सिनेमातून लग्नानंतर अ‍ॅक्टींगमध्ये धमाकेदार कमबॅक केलं आहे.