तृणमूलची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँचे ‘ग्रँड’ रिसेप्शन पार्टीतील फोटो ‘व्हायरल’ ! ‘या’ दिग्गजांची ‘हजेरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार अभिनेत्री नुसरत जहाँ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आज सकाळीच नुसरत जहाँ जगन्नाथाच्या रथ यात्रेत सहभागी झाली होती. अशातच संध्याकाळ होताच नुसरतने चाहत्यांना सरप्राईज केले आहे. लग्नानंतर आज नुसरतने ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. नुकतेच नुसरतचे पार्टीमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नुसरत नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. या पार्टीत नुसरतची खास मैत्रिण मिमी चक्रवर्तीही पोहोचली आहे. मरून कलरचा ड्रेस घातलेली नुसरत लाजत असतानाच पतीसोबत पोज देतानाही दिसत आहे.

पार्टीला सुरुवात होताच नुसरतचा ममता बॅनर्जींसोबत खास क्लिक

या पार्टीत अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उपस्थिती दाखवली आहे. पार्टीला सुरुवात होताच ममता बॅनर्जींसोबत नुसरतने खास फोटो क्लिक केला आहे. नुसरतच्या या ग्रँड रिसेप्शनचे आयोजन कोलकात्यातील ITC रॉयल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. ही पार्टी निखिल आणि नुसरत यांच्यासाठी खास असल्याने जेवणाच्या मेन्यूपासून ते सजावटीपर्यंत खास काळजी घेतली गेली आहे.

रिसेप्शनची खास बात म्हणजे शाकाहारी जेवण

या रिसेप्शनची आणखी एक खास बाब अशी की, या पार्टीत शाकाहारी जेवणावर खास लक्ष दिले गेले आहे. या शाकाहारी जेवणाचे कारण म्हणजे नुसरत जहाँचा पती निखिल. निखिलच्या घरी म्हणजेच नुसरतच्या सासरी केवळ शाकाहारी जेवणंच खाल्ल जातं. त्यामुळे या रिसेप्शनमध्ये ठेवलेल्या जेवणात शाकाहारी पदार्थांची खास काळजी घेतली गेली आहे. नुसरतच्या जवळच्या लोकांनी सांगितले आहे की, नुसरतच्या लग्नाच्या या पार्टीत इटालियन , बंगाली, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन डिशेस ठेवण्यात आल्या आहेत.

..तेव्हा प्रत्येकजण नुसरतला पहातच राहिला

नुसरतने १९ जून रोजी निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचंही लग्न मीडियात चांगलंच गाजलं. नुसरतने ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं. यानंतर सिंदूर लावून आणि चुडा घालून जेव्हा नुसरत संसदेत शपथ घेण्यासाठी आली तेव्हा प्रत्येकजण तिला पहातच होता.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?