उर्वशी रौतेलानं ‘कोरोना’ टेस्ट करताना भीतीपोटी केलं ‘असं’ काही ! पाहण्यासारखी होती आरोग्य कर्मचाऱ्याची ‘रिअ‍ॅक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. ती कायमच बिकिनीत दिसत असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळंही उर्वशी चर्चेत असते. उर्वशीचा एक व्हिडीओ समोर आहे जो सध्या अटेंशन घेताना दिसत आहे.

उर्वशीचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर जोरदार चर्चेत आहे, ज्यात ती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे. यावेळी तिनं तिचा टेस्टचा अनुभव देखील सांगितला आहे. याशिवाय तिच्या काही मजेदार मु्मेंट्सही या व्हिडीओत दिसत आहेत.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती कोरोना टेस्ट करत आहे. हेल्थ कर्मचारी तिच्या नाकातून स्वॅब घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यावेळी ती मात्र मागेमागे सरकत आहे. इतकंच नाही तिला हसायलाही येत आहे. तिचं हे वागणं पाहून हेल्थ कर्मचारीही हसताना दिसतो.

https://www.instagram.com/p/CIkFfmpBj2q/?utm_source=ig_embed

व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते, आरामानं उर्वशी. सुरक्षा सर्वात आधी. हसणंही आदी. एवढंच काय तर माझे हेल्थ केअर प्रोव्हाईडर माझ्यावर हसू लागले.

उर्वशीचा हा व्हिडीओ आणि तिच्या व्हिडीओचं कॅप्शन दोन्हीही खूप मजेदार आहे. उर्वशीचा हा अंदाजही चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसली. याशिवाय तिनं एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमातही काम केलं आहे. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.