बिकीनी न घातल्यानं ‘या’ अभिनेत्रीचं झालं कोटींचं नुकसान !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरच्या हातातून एका मोठ्या ब्रँडला प्रमोट करण्याची संधी निसटली आहे. याचे कारण म्हणजे तिचे बिकीनी घालण्याला नकार देणे आहे. नुकतीच वाणी कपूर तिचा आगामी सिनेमा वॉरच्या ट्रेलरमध्ये बिकीनी लुकमध्ये दिसली आहे. तिचा यापूर्वीचा सिनेमा ‘बेफिक्रे’मध्येही तिला अनेकदा बिकीनीत पाहण्यात आले आहे. परंतु आता पुन्हा एकदा ती आपली प्रतिमा बदलताना दिसत आहे. तिच्या या जिद्दीमुळे तिच्या हातातून एक मोठी संधी निघून गेली.

बड्या ‘स्किन स्केअर प्रॉडक्ट’ कंपनीने केली होती बिकीनी घालण्याची मागणी

समोर आलेल्या वृत्तानुसार, वाणी कपूरला एका मोठ्या स्किनकेअर प्रॉडक्ट कंपनीकडून ऑफर मिळाली होती. परंतु जाहिरातीत वाणीने बिकीनी घालावी अशी दिग्दर्शकाची मागणी होती. वाणी कपूरला जेव्हा याबाबत सांगितले गेले तेव्हा तिने यासाठी नकार दिला.

वाणी कपूर सिनेमात बिकीनीमध्ये दिसली आहे. वाणीचं म्हणणं आहे की, जाहिरातीत बिकीनी घालणं ठिक नाही. तिच्या मते जाहिरातीची पोहोच ही सिनेमाच्या तुलनेत जास्त असते. इतकेच नाही, तर जाहिरातचं प्रसारण सतत आणि दीर्घकाळ सुरु असतं. असे असताना जाहिरातीत जर ती बिकीनीमध्ये दिसली तर तिच्या अभिनेत्रीच्या प्रतिमेचे नुकसान होऊ शकते.

वाणी कपूरला नको आहे अशी प्रतिमा

‘शुद्ध देसी रोमँस’मध्ये वाणी कपूरने उल्लेखनीय अभिनय केला होता. तिचं असं म्हणणं आहे की, जर तिची आताच काही वेगळी प्रतिमा तयार झाली तर हे पुढे तिच्या करिअरसाठी ठिक असणार नाही.

 

Loading...
You might also like