Varun Dhawan-Natasha Dalal Grand Reception : ‘या’ दिवशी होणार ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं ‘ग्रँड’ रिसेप्सन !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. 24 जानेवारी 2021 रोजी (वार- रविवार) दोघं विवाहबद्ध झाले आहेत. अलिबागमधील द मेंशन हाऊसमध्ये दोघांनी 7 फेरे घेतले. लग्नबंधनात अडकल्यानंतर आता दोघंही खूप खुश आहेत. लवकरच वरुण लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवणार आहे.

अशी माहिती आहे की, मुंबईत वरुण-नताशाचं रॉयल रिसेप्शन होणार आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, बॉलिवूड सेलेब्ससाठी पुढील महिन्यात म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी रिसेप्शन असणार आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार या पार्टीत दिसणार आहे.

या आधी अशी माहिती समोर येत होती की, वरुण आणि नताशा यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी 26 जानेवारी रोजी होईल. असं मानलं जात आहे की, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्यानं कुटुंबानं रिसेप्शन पार्टीच्या तारखेत बदल केला आहे.

नताशा दलाल एक फॅशन डिझायनर आहे. नताशा आणि वरुण लहानपणीपासूनचे मित्र आहेत. शाळेत दोघंही सोबत होते. दीर्घकाळापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे.