3 वेगळे सिनेमे, 3 वेगळी गाणी, 3 वेगळ्या ॲक्ट्रेस, परंतु शर्ट मात्र एकच ! धर्मेंद्रच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार ‘चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची गणती त्या काळातील रोमँटीक हिरोंमध्ये होत असे. आत ते 85 वर्षांचे झाले आहेत. परंतु सोशलवर ते कायमच ॲक्टीव्ह असतात. सध्या त्यांच्या जुन्या गाण्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ तीन वेगळ्या सिनेमातील, 3 वेगळ्या गाण्यांचा आहे. यात ते 3 वेगळ्या ॲक्ट्रेस सोबत- राखी, शर्मिला टागोर, आशा पारेख यांच्या सोबत दिसत आहे.

परंतु या तीनही गाण्यात 1 कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचा शर्ट. धर्मेंद्र यांनी या 3 गाण्यात एक शर्ट घातला आहे. त्यांची ही तीन गाणी जीवन -मृत्यू, आया सावन झूम के आणि मेरे हमदम मेरे दोस्त सिनेमातील आहेत. साथिया नहीं जाना, चलो सजना जहां घटा चले आणि झिलमिल सितारों का आगन होगा अशी ही गाणी आहेत.

या तीन गाण्यात वेगळ्या हिरोईन सोबत धर्मेंद्र येलो आणि ब्राऊन स्ट्राईप्ड शर्ट आणि व्हाईट पँटमध्ये दिसत आहेत.

धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फूल और पत्थर, अनुपमा, सीता और गीता, शोले अशा अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. पद्म भूषण विजेता या अभिनेत्यानं घायल आणि यमला पगला दीवाना 2 यांसारखे सिनेमे प्रोड्युस केले आहेत. आता त्यांचा अपने 2 सिनेमा लवकरच येणार आहे.